दादागिरी नहीं चलेगी म्हणत विरोधी पक्षाची विधानपरिषदेत घोषणाबाजी, सभागृहात विरोधी पक्षाचं एकमत नाही

सात दिवसापासून राज्यात जुन्या पेन्शन योजना साठी राज्य सरकारी कर्मचारी संपावर आहेत. त्यावर तोडगा कढण्यावरून विधानपरिषदेत जोरदार पडसाद उमटले.

Update: 2023-03-20 09:06 GMT

जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करावी यासाठी राज्यातील सतरा लाख कर्मचारी संपावर (Employee strike) आहेत. मात्र गेल्या सात दिवसांपासून सरकारने फक्त एकच बैठक घेतली. यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने प्रयत्न न केल्याचा आरोप आमदार विक्रम काळे (Vikram Kale) यांनी केला. त्यावर उत्तर देता मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले की, जुनी पेन्शनच्या मुद्द्यावर सरकार सकारात्मक आहे. मात्र हा मुद्दा राजकारणविरहीत असावा, असं मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. त्यावेळी भाई जगताप (Bhai Jagtap) हे आक्रमक झाल्याने सुधीर मुनगंटीवार भडकले. यावेळी दादागिरी नहीं चलेगी अशा घोषणा विरोधी पक्षाने दिल्या. त्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य आक्रमक झाल्याने आधी ५, त्यानंतर १० आणि पुन्हा ५ मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आले.

दरम्यान आमदार विक्रम काळे अत्यंत आक्रमकपणे भूमिका मांडत होते. त्यांनी भूमिका मांडून विरोधी पक्ष सभात्याग करत असल्याचे म्हंटले. त्यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी विक्रम काळे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.मात्र यावेळी आमदार विक्रम काळे सभागृहाबाहेर गेले. विक्रम काळे वगळता कुणीही सभागृहाबाहेर पडले नाही. त्यामुळे विरोधी पक्षाचं जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर एकमत नसल्याचे स्पष्ट झाले.

Tags:    

Similar News