मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद मधील कार्यक्रमात भाजपच्या काही नेत्यांकडे पाहुन भावी सहकारी असा उल्लेख केल्याने राज्यात राजकीय चर्चेला उधाण आले. राज्यात शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. "राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. पण आज मला ते दिसत नाही. सरकार बनलेच पाहिजे असे नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. मुख्यमंत्र्याच्या कदाचित असे लक्षात आले असेल की आपण कशा लोकांबोरोबर काम करत आहोत. त्यांना रियलाईज झाले असेल, त्यातून असे वक्तव्य केले असेल.' असे फडणवीस यांनी म्हटले आहे. आम्ही सत्तेच्या मागे धावत नाही. आम्ही लढत आहोत, आमची भुमिका स्पष्ट आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणुन सक्षमपणे काम करत आहेत. सत्ता बनलीच पाहिजे अशी घाई आम्हाला नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.