मी चांगलं बोलायला गेलो तरी तुम्हाला आवडतं नाही. मुख्यमंत्री नेमके कुणाला म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं चांगलं बोलणं कुणाला आवडतं नाही असा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला आहे.

Update: 2022-12-29 13:08 GMT

सध्या नागपूर हिवाळी अधिवेशनात आरोप प्रत्यारोपांची फेरी पाहायाला मिळतं आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ खात्याचे मंत्री असताना "त्यावेळी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी माझ्या खात्यासंदर्भात कोणतेच काम माझ्याकडे नाही, अशी मी पूर्वसूचना फडणवीस यांना दिली होती. त्यामुळे त्यांनी समृद्धी महामार्गाची जबाबदारी मला दिली होती. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांना सर्व घटना माहिती असून देखील ते सतत बोलायचे समृद्धी महामार्ग कुणाला दिलाय. त्यांनी अनेकदा माझ नाव न घेता टीका केली होती. 

"असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केले होते. शिंदे यांच्या आरोपाला प्रत्युतर देत आव्हाड म्हणाले की, मी असं कधीच बोललो नव्हतो. तसेच एकनाथ शिंदे पुढे म्हणाले मी तुमच्याबद्दल चांगल बोलायला गेलो तरी तुम्हाला आवडतं नाही, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला. तसेच शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती देखील टीका केली.

गेली दोन वर्षे अधिवेशन नागपूरात झालं पाहिजे असं विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. शिंदे-फडणवीस सरकार आलं नसतं तर आताच अधिवेशन हे नागपूरात झालं नसतं. चीन आणि कोरियामधील कोरोनाचे उदारहणे देऊन आकडेवारीचे निकष लावत बसले असते. तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांना देखील माहिती आहे की, लॉकडाऊन आणि कोरोना कुणाचा आवडता विषय आहे. असं विधान करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली.

Tags:    

Similar News