डरो मत.. राहुल गांधी कडाडले; नरेंद्र मोदींना राहुल गांधी यांचे कडवे आव्हान
डरो मत... असं राहुल गांधी का म्हणाले जाणून घेण्यासाठी वाचा...;
भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील तिसऱ्या दिवशी काँग्रेसनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी देशातील जनतेला डरो मत चा नारा दिला आहे. लोकांमध्ये भीती निर्माण करून द्वेषभावना पेरली जात आहे. देशातील जनतेला महागाई, बेरोजगारी तसंच विविध कारवायांच्या माध्यमातून दहशतीखाली आणून द्वेष पसरवला जात आहे. इथले छोटे-मध्यम उद्योग बंद पाडले जात आहेत, नोटबंदी-जीएसटी आणि कोविडच्या काळातील अव्यवस्था या चूका नव्हत्या तर लोकांना घाबरवण्याची रणनीती होती असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) आणि संघपरिवारावर जोरदार हल्ला चढवत भारतातील जनतेला निर्भय व्हा असा सल्ला दिला आहे. आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यांमध्ये का जात आहेत यावर भाष्य केले. काही ठराविक उद्योगपतींच्या खिशातच सर्व उद्योग जाणार आहेत, त्याची ही रणनिती असल्याचं राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले.
राहुल गांधी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -
१) महिलांचा सन्मान जो देश करत नाही तो पुढे जाई शकत नाही
२) RSS हिंसा, द्वेष पसरवत आहे. नोटबंदी, किसान काळे कायदे लावून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय
३) सरकार आमच्याशी जुगार खेळते, आमच्या शेतमालाला योग्य किमत मिळत नाही. शेतातून उत्पन्न मिळत नाही. शेतकऱ्यांनी केली राहुल गांधींकडे तक्रार ४) देशातील दोन-तीन उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे आखली जातात. सगळे प्रोजेक्ट नरेंद्र मोदींच्या मित्रांच्या हवाली होतायत. सगळी संपत्ती या लोकांनाच दिली जातेय. ५) एक ही सेक्टर सोडलेले नाही. एअरपोर्ट पासून टेलिफोन पर्यंत सगळं या लोकांच्या हवाली केले जातंय-
६) नोटबंदी चूक नव्हती, ती रणनीती होती. जीएसटी, नोटबंदी आणि कोविडच्या वेळेस जे केलं ते छोट्या उद्योगांना संपवण्याचे षडयंत्र होते. जर हे उद्योग संपले नाहीत तर त्या मोठ्या उद्योगपतींना बिझनेस मिळाला नसता
७) सगळे सेक्टर संपवले जातील. पूर्ण भारत बेरोजगार होईल. कारण मोठे उद्योग रोजगार देत नाहीत. छोटे-मध्यम उद्योग, सार्वजनिक उद्योग, शेती आणि शेतीआधारित उद्योगातून रोजगार निर्माण होतो.
८) सरकारी कंपन्यांचं खाजगीकरण झाल्याने शासकीय नोकऱ्या मिळण्याची शक्यता संपलीय. दुसरी कडे महागाई वाढलीय. युपीए च्या वेळेस ६० चं पेट्रोल आज ११० रुपये आहे. डिझेल-गॅस काय किंमतीला मिळतंय. आज ११०० रूपये गॅस झालाय पण मोदी एक शब्द बोलत नाहीत.
९) लोकांच्या मनात भीती निर्माण केली जातेय. ही भीती मिडीया लोकांमध्ये पसरवली जाते. ही मिडीया देशात द्वेष पसरवण्याचं काम करत आहे. या मिडीयाचं काम भीती पसरवण्याचं काम करत आहे.
१०) सर्व मिडीया मोदींच्या त्या मित्रांच्या ताब्यात. कोणीही पत्रकार या मिडीयात काम करू इच्छित नाही, बघा सगळे मिडीयावाले हसतायत.
११) संसदेत काही बोलायला गेलं की माइक बंद केला जातो. चीन ची सेना भारतात आली काही बोलायला गेलं की माइक ऑफ केला जातो.
१२) ईडी-सीडी से कोई डरता नहीं है, जो करना है कर लो.
१३) पंतप्रधान म्हणतात की कुठलीही घुसखोरी झालेली नाही, पण मोदी इन्कार करतात. मग २२ वेळा बातचित कसली झाली. भारतीय सेना म्हणतेय की भारताच्या जमीनीवर कब्जा झाला पण पंतप्रधान इन्कार करतायत.
१४) २५ किलोमीटर चालतोय दररोज पण थकवा येत नाही, कारण तुमची शक्ती आम्हाला ऊर्जा मिळतेय. ही शक्ती आम्हाल श्रीनगर पर्यंत पोहोचवेल.
१५) डरो मत... किसी चीज से डरो मत. जीवनात कशालाही घाबरू नका. घाबरला नाहीत, तर कुणाचा द्वेष ही करणार नाहीत. या देशात द्वेष नाही, प्रेम पसरवा.
१६) देशभक्ती आपापसात लढायला सांगत नाही. एकीकडे झेंड्याला सलाम करायचा आणि दुसरीकडे भावाला भावाशी लढायला लावायचं ही देशभक्ती नाही.
राहुल गांधी यांचे संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी क्लिक करा.