बिहारचं सरकार कोसळल्यानं भाजपचं राज्यसभेतील गणित बिघडलं...

बिहारचं सरकार कोसळल्यानं भाजपचं राज्यसभेतील गणित कसं बिघडलं वाचा...

Update: 2022-08-10 08:56 GMT

जेडीयू आणि भाजपचं बिहारमध्ये सरकार कोसळलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील भाजप आणि जेडीयू युतीचं सरकार कोसळलं आहे. हे सरकार कोसळल्यानंतर भाजपच्या केंद्रात अडचणी वाढणार आहेत.

जनता दल युनायटेडच्या राज्यसभेत 5 जागा आहे. राज्यसभेचे उपसभापती पद जेडीयूकडे आहे. उपसभापती हरीवंश हे जेडीयूचे खासदार आहे. 2020 ला ते पुन्हा एकदा निवडून आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरीवंश यांच्या कामाचं तोंडभरून कौतूक केलं होते. हरिवंश यांनी सदनाचं कामकाज उत्साहाने आणि शालीनतेने केलं. अशा शब्दात मोदी यांनी हरीवंश यांची स्तुती केली होती. मात्र, आता भाजप आणि जेडीयू चं सरकार कोसळल्यानं हरीवंश यांना राजीनामा द्यावा लागू शकतो.

काय आहे राज्यसभेचं गणित

जेडीयूचे पाच खासदार आता राज्यसभेतील विरोधी पक्षाचा भाग होणार आहेत. त्यामुळं एनडीएच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या आता 100 पेक्षा कमी झाली आहे. 237 सदस्य संख्या असलेल्या राज्यसभेत एनडीएचे निम्म्याहून कमी म्हणजे 119 खासदार आहेत. त्यामुळे भाजपला यापुढे राज्यसभेत विधेयक मंजूर करून घेता येणार नाही. उपसभापती म्हणजेच हरिवंशही त्यांना मदत करू शकणार नाहीत.

राज्यसभेत भाजपची स्थिती कधीही चांगली राहिली नाही. मात्र, जेडीयूच्या मदतीने त्यांनी राज्यसभेत अनेक विधेयकं मंजूर केली होती. आता ते दिवस संपले आहेत. जेडीयूचे खासदार आता भाजपला पाठिंबा देणार नाहीत.

भाजपला आता वायएसआर काँग्रेस आणि बिजू जनता दलाच्या प्रत्येकी 9 सदस्यांवर आणि एआयएडीएमकेच्या 4 सदस्यांवर अवलंबून राहावं लागणार आहे. 3 नामनिर्देशित सदस्यांना राज्यसभेत आणून भाजप नंबर वाढवू शकतो. सहसा नामनिर्देशित सदस्य सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देतात. मात्र हे तीन सदस्य घेतले तरी भाजपचं गणित पूर्ण होत नाही. त्यामुळं आगामी हिवाळी अधिवेशनात भाजपची कसोटी लागणार आहे.

देशाच्या राजकारणात एक वाक्य नेहमी कानावर पडतं ते म्हणजे बिहार-उत्तरप्रदेशशिवाय देशाचे राजकारण पूर्ण होत नाही. ते आता समोर येत आहे. अगदी अलीकडच्या काळात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या भाजपला जेडीयूच्या नितीश कुमार एका झटक्यात जमिनीवर आणले आहे. भाजपच्या आक्रमक वृत्तीमुळे संपूर्ण विरोधक हताश आणि निराश झालेले असताना, जेडीयूने मोठी आशा दिली आहे.

Tags:    

Similar News