भारत श्रीमंत देश पण जनता गरीब, नितीन गडकरी यांचे वक्तव्य चर्चेत

नितीन गडकरी नेहमी आपल्या वक्तव्याने चर्चेत असतात. त्यातच भारत हा श्रीमंत देश आहे पण जनता गरीब असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.;

Update: 2022-10-01 02:27 GMT

भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. मात्र देशात गरीबी, बेरोजगारी आणि उपासमारीची समस्या आहे. त्यामुळे भारत हा गरीब लोकांचा श्रीमंत देश असल्याचे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे. नितीन गडकरी हे नागपूर येथे बोलत होते.

नितीन गडकरी आपल्या परखड वक्तव्याने कायम चर्चेत असतात. त्यातच नितीन गडकरी नागपूर येथे बोलताना म्हणाले, देशात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत चालली आहे. त्यामुळे भारत हा श्रीमंत देश पण गरीब जनता आहे. देशात गरीबी, बेरोजगारी, उपासमार, महागाई, जातीयवाद आणि अस्पृश्यता यासारख्या अनेक समस्या आहेत. या समस्या देशाच्या प्रगतीसाठी चांगल्या नाहीत. त्यामुळे आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करण्याची गरज आहे. देशातील 124 जिल्हे हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्या मागास आहेत. त्यातच देशातील शहरी भागात विकास झाला. मात्र ग्रामिण भागात विकास झाला नाही. त्यामुळे ग्रामिण भागातील लोक शहरांमध्ये स्थलांतरीत होत आहेत. त्यातच कमी पगार आणि महागाईमुळे मंदी आल्याचे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या स्पष्टवक्तेपणाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली आहे.


Tags:    

Similar News