उध्दव ठाकरे यांच्या हातून धनुष्यबाण गेल्यानंतर नितेश राणे यांचे विकट हास्य
निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर नितेश राणे यांना हसू आवरलं नसल्याचं ट्वीट केलं आहे.
शिवसेनेत (Shivsena Split) पडलेल्या उभ्या फुटीनंतर शिवसेनेवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दावा केला होता. या प्रकरणावर निवडणूक आयोगात (Election Commission of India) सुनावणी सुरू होती. अखेर निवडणूक आयोगाने 17 फेब्रुवारी रोजी शिवसेना पक्ष (shivsena party) आणि पक्ष चिन्ह असलेले धनुष्यबाण (Party Symbol Bow And Arrow) शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. हा निवडणूक आयोगाचा निर्णय उध्दव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Nitesh Rane Tweet)
नितेश राणे यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यामध्ये नितेश राणे हसत आहेत. यामध्ये नितेश राणे यांना हसूच आवरत नसल्याचे दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देतांना नितेश राणे यांनी म्हटले आहे की, प्लीज फॉरवर्ड हा व्हिडीओ उध्दव ठाकरे आणि त्यांचे बेबी पेंग्विन असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांचा उल्लेख नितेश राणे यांनी पेंग्विन असा केला आहे. तसेच नितेश राणे यांनी म्हटलं आहे की, त्यांना माझा व्हिडीओ दिसणार नाही. कारण त्यांनी मला ब्लॉक केले असेल. हसू कंट्रोल होतच नाही, असं नितेश राणे यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
Pls forward this smiling face to UT n his baby penguin..
— nitesh rane (@NiteshNRane) February 17, 2023
Kyunki mujhe block Kiya hoga..
Control nahi hota hai 😂🤣 pic.twitter.com/WVENFOFguf