धनंजय मुंडे यांच्या वाहनाला अपघात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कारला मध्यरात्री परळी शहरात अपघात झाला. या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे.;

Update: 2023-01-04 06:42 GMT
धनंजय मुंडे यांच्या वाहनाला अपघात
  • whatsapp icon

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे मंगळवारी परळी (Parli) विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. दरम्यान हा दौरा आटोपून परतत असताना रात्री साडेबाराच्या आसपास धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात (Dhananjay Munde car accident) झाला. या अपघातात धनंजय मुंडे (Munde Accident) यांच्या छातीला किरकोळ मार लागला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी धनंजय मुंडे यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

धनंजय मुंडे यांच्या अपघातानंतर त्यांच्या प्रसिध्दी विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाला. ते मतदारसंघातील कार्यक्रम आटोपून घराकडे परतत होते. त्यावेळी वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाला. यामध्ये धनंजय मुंडे सुखरुप असल्याचे धनंजय मुंडे यांच्या प्रसिध्दी प्रमुखाने सांगितले आहे. या अपघाताबाबत अफवा पसरवू नका. धनंजय मुंडे हे सुखरुप आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही, असंही मुंडे यांच्या प्रसिध्दीप्रमुखाने सांगितले आहे.

Tags:    

Similar News