राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांची देखील आता चौकशी होणार आहे, अशा स्वरुपाचे ट्विट भाजपचे नेते मोहीत कम्बोज यांनी केले आहे, त्यावर शरद पवार यांना ठाण्यातील पत्रकार परिषदेत विचारले असता, शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले. बारामती एग्रो लिमिटेड कंपनीचा आपण अभ्यास करत असून लवकरच त्यांची यशोगाथा सगळ्यांसमोर मांडू असे सूचक ट्विट कंबोज यांनी केले होते. दरम्यान याच पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करत अनिल देशमुख यांच्यावर ११०वेळा रेड टाकली गेली असाही आरोप शरद पवारांनी केला.