VIDEO: नवाब मलिक यांना पाठबळ कोणाचं? ऐका त्यांच्याच तोंडून

Update: 2021-11-11 08:22 GMT

आर्यन खान प्रकरणात तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नवाब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली आणि संपूर्ण मंत्रीमंडळ माझ्या पाठीशी असल्याची माहिती पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.

माझ्या पाठिशी जसे मंत्रीमंडळ आहे तसे शरद पवार आणि पक्ष पाठिशी असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे. दरम्यान माझी लढाई ही अन्यायाविरोधात आहे. सध्या ही लढाई लढण्यासाठी मी एकटा पुरेसा असून ही लढाई पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबणार नाही. असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

Tags:    

Similar News