काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांना एका जुन्या प्रकरणात आज न्यायालयाने एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण 34 वर्षे जुनं आहे. ३४ वर्षा अगोदर झालेल्या एका जुन्या प्रकरणातील पीडित कुटुंबियांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने नवज्योत सिंह सिद्धू यांना एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती एएम खानविलकर आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
सिद्धू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशाचा हवाला देत त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या या याचिकेचा विरोध केला होता. मात्र, न्यायालयाने पीडितेचा रस्त्यात धक्का लागून मृत्यू झाल्याचा कोणताही पुरावा नाही. असं म्हणत सिंद्धू यांना एक वर्षांची सजा सुनावली आहे.
काय आहे प्रकरण?
27 डिसेंबर 1988 रोजी पटियाला येथे ही घटना घडली होती. पार्किंगवरून झालेल्या वादात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पीडित व्यक्ती आणि इतर दोघे बँकेतून पैसे काढण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्यात एक जिप्सी दिसली आणि त्यांनी सिद्धूला ती काढण्यास सांगितले. आणि इथूनच वादाला सुरुवात झाली. सिद्धूने गुरनाम सिंहला मारहाण करून घटनास्थळावरून पळ काढल्याचा पोलिसांचा दावा आहे.
दरम्यान जखमी गुरनामला रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले होते. या प्रकरणी 2006 मध्ये नवज्योतसिंह सिद्धू यांना उच्च न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
Will submit to the majesty of law ….
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) May 19, 2022