Dr. Sudhir Tambe Suspended : संक्रांती दिवशीच काँग्रेसने कापला डॉ. सुधीर तांबे यांचा पतंग

सत्यजित तांबे (satyajit Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यातच डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने त्यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे.;

Update: 2023-01-15 15:01 GMT
Dr. Sudhir Tambe Suspended : संक्रांती दिवशीच काँग्रेसने कापला डॉ. सुधीर तांबे यांचा पतंग
  • whatsapp icon

नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणूकीसाठी काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना उमेदवारी दिली होती. त्याबरोबरच सुधीर तांबे यांच्या नावाने काँग्रेसने एबी फॉर्मही दिला होता. मात्र तरीही डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. याऊलट त्यांचे पूत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तर यामागे भाजपची (BJP) खेळी असल्याची चर्चा रंगली आहे.

काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना नाशिक पदवीधर विधानपरिषद (Maha MLC Election) निवडणूकीसाठी उमेदवारी देऊनही अर्ज दाखल न केल्याने काँग्रेस (Congress) तोंडघशी पडले आहे. त्यामुळे डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज का दाखल केला नाही? याची चौकशी करू, असं मत नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केले होते. त्यातच आता काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने काँग्रेस नेते डॉ. सुधीर तांबे यांची चौकशी पूर्ण होऊस्तोवर त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. सुधीर तांबे यांचे निलंबन करण्यात आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना डॉ. तांबे म्हणाले, माझ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र माझी चौकशी होईपर्यंत मला याबाबत काहीही बोलायचं नाही. आम्ही भाजपकडे पाठींबा मागण्यासाठी गेलो नाहीत. त्यामुळे आम्ही मागितलाच नाही तर भाजप पाठींबा देईल तरी कसा? असा सवाल डॉ. तांबे यांनी उपस्थित केला. याबरोबरच पक्षाने बोलावलं तर मी माझी बाजू मांडण्यासाठी नक्की जाईन, असं मत डॉ. तांबे यांनी व्यक्त केले.




 


Tags:    

Similar News