''बंडखोर कॉंग्रेसच्या उमेदवाराला कॉंग्रेसचा पाठिंबा नाही'' - नाना पटोले
सत्यजीत तांबेंना कॉंग्रेसचा पाठिंबा नाही. तांबे पिता-पुत्रांवर योग्य कारवाई केली जाणार आहे. पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना आम्ही तिकीट दिली होती. त्यांनी उमेदवारी अर्ज न भरून पक्षासोबत फसवेगिरी केली आहे आणि मुलाला अपक्ष भरायला लावला. त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी सांगितले की, मी भाजपचा पाठिंबा घेणार आहे. हा मोठा दगाफटका तांबे पिता-पुत्राने कॉंग्रेससोबत केला आहे. बंडखोर कॉंग्रेसच्या उमेदवाराला कॉंग्रेसचा पाठिंबा नाही. भाजपचं भय दाखवुन घर तोडण्याच्या खेळी सुरु झाली असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटल आहे.
यावेळी बोलताना काँग्रेस बंडखोर उमेदवारांना पाठिंबा देणार नाही अशी भूमिका जाहीर करत ज्या दिवशी भाजपचं घर फुटेल, त्यादिवशी भाजपला दुसऱ्यांची घरे फोडण्याची दु:ख कळेल. भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कुणाचाही अर्ज दाखल केला नाही. इकडे सत्यजीत तांबे अपक्ष नामांकन दाखल करतात आणि भाजपचा पाठिंबा मागतात. याचा अर्थ हे सर्व आधी ठरलेले होते. हा धोका पक्ष विसरणार नाही आणि ही निवडणूक काही सामान्य निवडणूक नाही. या निवडणुकीत पदवीधर लोक मतदार आहेत आणि ते काही मूर्ख नसल्याचं नाना पटोले यांनी म्हंटले आहे..