मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार

Update: 2021-10-09 09:19 GMT


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या कार्यक्रमात नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचे श्रेय आपलेच आहे, असा दावा राणे यांनी केलीय. जिल्ह्यात ज्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, त्यासाठी नारायण राणे यांचेच नाव आहे, दुसऱ्याचे नाव घेता य़ेऊ शकत नाही. या कार्यक्रमात राजकारण करू नये असं मला वाटत होतं, असे सांगत नारायण राणे यांनी शिवसेनेला टोले लागले.

मुख्यमंत्री कार्यक्रमाआधी आपल्याला भेटले, आपल्या कानात काहीतरी बोलले पण आपण ते ऐकले नाही, असेही राणे यांनी यावेळी सांगितले. चिपी विमानतळाला ज्यांनी विरोध केला होता ती लोक व्यासपीठावर आहेत, पण आपण नाव घेऊन राजकारण करणार नाही, असे म्हणत राणे यांनी टीका केली. आदित्य ठाकरे लहान आहेत त्यांच्यावर आपण टीका करणार नाही ते टॅक्स फ्री आहेत, असा टोलाही राणेंनी लगावला. पण विमानतळाला पाणी नाही, वीज नाही तसेच ३४ कोटींचा रस्ताही नाही हा कसला विकास, असा सवाल त्यांनी वितारला. विमानतळ झाले आहे पण तिथे उतरल्यावर लोकांनी काय खड्डे पाहावेत का, असा सवाल उपस्थित करत राणे यांनी उपस्थित केला. उद्घाटनाचा कार्यक्रम एमआयडीसीचा आहे, म्हैसकर यांचा, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा की देसाई कंपनीचा हे कळलंच नाही, अशा शब्दात राणे यांनी टीका केली.

Tags:    

Similar News