राणे यांच अटक नाट्य अन् फडणवीसांची गोची...

Update: 2021-08-24 03:54 GMT

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. राणेंचा मुक्काम सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये असून त्यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. मात्र या सर्व अटक प्रकरणात भाजप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची गोची होतांना दिसत आहेत.

राणेंना केंद्रीय मंत्री पद मिळाल्यानंतर फडणवीसांची भाजपमध्ये उंची कमी झाली असल्याच्या पोस्ट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरताना पाहायला मिळत आहे. त्यात आता जर राणेंना अटक झाली आणि भाजप कार्यकर्त्यांनी राज्यभरात या विरोधात रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली तर राणे रातोरात हिरो बनणार यात काही शंका नाही.

पण सद्या राज्यात भाजपमध्ये फडणवीस बोलतील तीच दिशा असे चित्र आहे. त्यामुळे राणेंचा राज्यात वाढत प्रभाव फडणवीस यांच्यासाठी अडचणीच ठरू शकते असे मत राजकीय अभ्यासकांच आहे.त्यामुळे आता आज दिवसभरात घडणाऱ्या राणेंच्या अटक नाट्य जरी शिवसेना-भाजप दिसत असेल,पण मुळात हे भाजपमधील अंतर्गत चढाओढ सुद्धा स्पष्ट करणारी ठरू शकते.

Tags:    

Similar News