मी बसून बोलणाऱ्यांचं ऐकत नसतो, नारायण राणे यांची नीलम गोऱ्हे यांच्याशी हुज्जत
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांचे तैलचित्र लावण्यात आले. या कार्यक्रमात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे विरुध्द नारायण राणे आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले.;
विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे तैलचित्र लावण्याचा सरकारी कार्यक्रम विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे(Ambadas Danve), केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह आमदार आणि खासदार उपस्थित होते. या कार्यक्रमात नारायण राणे यांनी नीलम गोऱ्हे (Narayan Rane VS Neelam Gorhe) यांच्याशी हुज्जत घातल्याचे पहायला मिळाले.
नारायण राणे यांचे भाषण सुरु असताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे उठून सभागृहाबाहेर निघाले होते. त्यावेळी त्यावेळी नारायण राणे यांनी छगन भुजबळ यांना अडवले. त्यावेळी छगन भुजबळ यांनी नारायण राणे यांना हात दाखवला. त्यावरून मला भुजबळ यांनी समर्थन देण्यासाठीच हात दाखवला. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांनी राणेंकडून औचित्यभंग केला असल्याचे म्हटले. नारायण राणे यांचे भाषण थांबवण्याची विनंती नीलम गोऱ्हे यांनी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना केली. त्यावर मी बसून बोलणाऱ्यांचं ऐकत नसतो, अशी टिपण्णी नारायण राणे यांनी केली. त्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी पुन्हा एकदा भाषण थांबवण्यास सांगितले. त्यावर मी थांबणार नसल्याचे राणे यांनी सांगितले. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी विचारले की, हे काय चाललं आहे. आणखी किती वेळ चालणार? यानंतर नारायण राणे यांनी हा वाद थांबवला.