मी परत ते वाक्य बोलणार नाही: नारायण राणे

Update: 2021-08-25 11:27 GMT

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर त्यांना रात्री 24 ऑगस्टला जामीन मंजूर झाला. त्यानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राणे यांनी दोन्ही निकाल माझ्या बाजूनेच लागले. याचा अर्थ देश कायद्यानेच चालतो. केस न्यायालयात असल्यानं मी काही भाष्य करणार नाही.

यावेळी त्यांनी जनआशिर्वाद यात्रेची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला संधी दिली. त्याबाबत त्यांनी मोदी यांचे आभार मानले. तसंच त्यांनी या सर्व प्रकरणात जे.पी. नड्डासह सर्व भाजप पक्ष माझ्या मागे उभा राहिला. त्याबाबत मी त्यांचे आभार मानतो. तसंच आपली जनआशिर्वाद यात्रा अशीच सुरु राहील. असं यावेळी त्यांनी जाहीर केलं.

यावेळी त्यांनी "मी असं काय बोललो होतो की राग आला. ते वाक्य काय मी परत बोलणार नाही. कोर्टाचा निकाल येईपर्यंत बोलणार नाही. भुतकाळामध्ये एखादी गोष्ट घडली आणि त्याची माहिती दिली. तो कसा गुन्हा होतो.''

Tags:    

Similar News