Narayan Rane on Uddhav Thackeray : लवकरचं ठाकरे गटाचे १५ आमदार शिंदे गटात येणार- नारायण राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यानी आज एक सूचक विधान करुन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. ठाकरे गटातील उर्वरित १५ आमदार लवकरच शिंदे गटात जाणार असल्याचे राणे यांनी सांगितले.;

Update: 2023-03-08 14:49 GMT

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेत सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणातून शिंदे गटासह भाजपवर ( BJP ) जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांच्या या सभेनंतर केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी सूचक व्यक्तव्य करुन ठाकरे गटाला टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांची खेड येथील सभा पूर्वनियोजित असल्याचे राणे यांनी सांगितले. पूर्वी शिवसेनेच्या सभा जाहीर व्हायच्या. पण खेडला उद्धव ठाकरे येणार आहेत, हे कळल्यानंतर सगळे लोक स्वत:हून सभेला उपस्थित राहून सभेतील भाषण ऐकण्यासाठी आतूर असायचे. मात्र आता ते दिवस राहिलेले नाहीत. खेडच्या सभेसाठी मुंबई, रायगड आणि रत्नागिरीहून यावेळी माणसं आणावी लागल्याचे राणे यांनी सांगितले. आणि ही सभा विराट असल्याचे दाखवण्यात आले. तसेच ही सभा विराट असल्याचे दाखवण्यासाठी दोन खुर्चीमध्ये एक माणूस झोपेल इतकी जागा सोडण्यात आली होती. त्यामुळे ही सभा विराट तर नव्हतीच, पण या सभेला स्थानिक नागरिकही उपस्थित नसल्याचे राणे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री (Chief Minister) पदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी काहीही केलेले नाही. ठाकरे यांनी राज्याच्या विकासाबाबत आणि जनतेबद्दल काहीही बोलता येत असल्याचे राणे यांनी सांगितले. कोकणात अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले होते, त्याचे अद्यापही पैसे मिळाले नसल्याचा आरोप राणे यांनी केला. ठाकरे यांनी कोकणाला अडीच वर्षात किती नवीन योजना दिल्या? याचे उत्तर द्यावे. उद्धव ठाकरे हे अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत फक्त अडीच तास मंत्रालयात गेले असल्याचे राणे यांनी सांगितले. अशा माणसाकडून राज्यातील जनतेने काय अपेक्षा करायची...त्यामुळे आता शिवसेना संपली आहे. त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीतपर्यंत उरलेले १५ आमदार सुद्धा शिंदे गटात सहभागी होतील, असे सूचक विधान नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी मुंबईतील विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

आता राज्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ताकतच उरलेली नसल्याचे राणे यावेळी म्हणाले. मंत्रालयात यायची त्यांची आता ताकत सुद्धा नाही, ते महाराष्ट्र कसा पिंजून काढणार? जे चार पावलं चालू शकत नाहीत, ते महाराष्ट्राचा दौरा करणयाची भाषा करत आहेत. आता त्यांचं वय झाल्याचं राणे यावेळी म्हणाले. वयात असतानाही ते काही करु शकले नाहीत. आक्रमक शिवसैनिकांमुळे शिवेसेना घडली असल्याचे राणे म्हणाले. त्यामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा एक टक्काही वाटा नसल्याचे राणे यांनी सांगितले. ठाकरेंनी कधीही एकाला कानफटात मारले नाही. हा त्यांचा इतिहास आहे. आघाडी जनतेच्या मनातून बिघडली असल्याचे सुद्धा राणे यावेळी म्हणाले.      

Tags:    

Similar News