नारायण राणे यांना कोणतं खातं मिळणार?
केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार नारायण राणे यांना कोणतं खातं मिळणार? Narayan Rane Amit shaha Narendra Modi Cabinet Expansion Which post Will get Narayan rane in Modi Cabinet
मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. या चर्चेत महाराष्ट्रातून नक्की कोणाला संधी दिली जाणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रातून काही नावं चर्चेत आहेत. त्यामध्ये नारायण राणे, प्रीतम मुंडे, उदयनराजे भोसले आणि भारती पवार ही नाव आघाडीवर आहेत. दरम्यान या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांचं देखील नाव चर्चेत होतं. मात्र, स्वत: फडणवीस यांनी मंत्री पद नाकारल्याची चर्चा आहे.
मात्र, या सर्वांमध्ये नारायण राणे यांचा मोदी यांच्या मंत्रीमंडळात समावेश केला जाणार असल्याचं जवळ जवळ निश्चित समजलं जात आहे. त्यामुळं नारायणे राणे यांना कोणतं खातं मिळणार? याची सध्या चांगलीच चर्चा आहे. नारायण राणे आणि गृहमंत्री अमित शहा यांचे चांगले संबंध आहेत. या संबंधामुळेच राणे यांना केंद्रात चांगलं खातं मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडल्यानंतर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री हे खातं मिळण्याची शक्यता आहे. कारण हे खातं सातत्याने महाराष्ट्राकडे राहिलेले आहे. त्यामुळं राणे यांनी कोणतं खातं मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांचा नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात समावेश
ज्योतिरादित्य सिंधिया (शिंदे) यांना मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. ज्योदिरादित्य शिंदे यांच्यासोबत काही आमदारही आल्याने भाजपला मध्य प्रदेशात पुन्हा सत्ता मिळवता आली. त्यामुळे शिंदे यांचा विचार करावा लागणार आहे, असे सांगितले जात आहे.
आसाममध्ये पक्षाला भक्कम करुन पुन्हा सत्ता मिळवून देणाऱ्या माजी मुख्यमंमत्री सरबनंदा सोनवाल यांचाही विचार केला जाण्याची शक्यता आहे.
लोकजनशक्ती पार्टीमध्ये सध्या मोठी फूट पडली आहे. त्यामुळे मोदी चिराग पासवान यांना जवळ करतात की त्यांना अध्यक्षपदावरुन दूर करणाऱ्या खासदारांना ते कळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात भाजपसोबत असलेल्या अपना दललासुद्धा जागा मिळते का ते पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची कारणं?
1. प.बंगालमध्ये भाजपचा मोठा पराभव
2. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या कारभाराबाबत असलेली पक्षांतर्गत नाराजी
3. महाराष्ट्रात शिवसेना भाजपपासून वेगळी झाली
4. गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, मणीपूर आणि गोवा या राज्यांच्या येत्या विधानसभा निवडणूका
5. NDA मधील घटकपक्षांची नाराजी