सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज थेट राज्यपालांची भेट घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबतच आज नाना पटोले राज्यपालांची भेट घेतली असून त्या अगोदर मुंबईतील हॅंगिग गार्डन या ठिकाणाहून सायकल द्वारे राजभवनावर पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही नेते देखील आहेत.
राज्यपालांना भेटून ते वाढलेल्या इंधन दरवाढीबाबत, वाढवलेली महागाई कमी करा. तसंच शेतकरी कायदे रद्द करा. आणि ओबीसी आरक्षणाचा इम्पेरिकल डाटा राज्याला मिळावा. या मागण्यांचे निवेदन ते राज्यपालांना देणार आहेत.