जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही, नाना पटोले यांचे स्पष्टीकरण
शिक्षक- पदवीधर आणि कसबा पोटनिवडणुकीत विजयानंतर महाविकास आघाडीने लोकसभेसाठी फॉर्म्युला ठरवल्याचे वृत्त TV9 मराठीने सूत्रांच्या हवाल्याने दिले होते. मात्र हे वृत्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फेटाळून लावले.;
राज्यात झालेल्या शिक्षक (Teacher), पदवीधर निवडणुकीपाठोपाठ (Graduate Election) कसबा (kasbah) पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने विजय मिळवला. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीने एकत्र सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाविकास आघाडीची बैठक झाली. यामध्ये लोकसभेसाठी फॉर्म्युला ठरवल्याचे वृत्त TV9 ने दिले होते. मात्र आमच्या बैठकीत अशा प्रकारे कुठलाही निर्णय झाला नसल्याचं नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, आगामी काळात आम्ही भाजप (BJP) विरोधात जनतेच्या प्रश्नांवर रणशिंग फुंकणार असल्याचं नाना पटोले म्हणाले. त्यामुळे कालच्या बैठकीत आम्ही कुठलाही फॉर्म्युला ठरवला नाही. या काही वृत्त वाहिन्यांनी उडवल्या वावड्या असल्याचे नाना पटोले म्हणाले.