नवाब मलिकांवर ईडीची कारवाई;महाविकास आघाडीच्या नेत्यांचा भाजपावर हल्लाबोल

Update: 2022-02-23 06:09 GMT

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे ईडीच्याच्या रडारवर आले आहेत नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे. बुधवारी पहाटे ईडीचे अधिकारी मलिकांच्या घरी पोहचले, त्यावरच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपावर हल्लाबोल सुरु केला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की नवाब मलिक किंवा आम्ही सातत्याने बोलतोय, सत्य बोलतोय त्यांच्यामागे ई़डी सीबीआय मागे लावले जातेय.चौकशी होईल. संध्याकाळी घरी येतील.किरीट सोमय्यांनी ईडीकडे हे प्रकरण दिलं आहे.भाजपा नेत्यांची आम्ही सगळी प्रकरणे ईडीकडे देणार आहोत.भाजपा व्यतिरिक्त सर्व पक्षांसाठी ईडी आहे का.मलिक कॅबिनेट मंत्री आहेत.मलिक सत्य बोलत आहेत.,२०२४ नंतर चित्र वेगळे असेल,२०२४ नंतर आम्ही सुद्धा तुमच्या मागे अशा तपास यंत्रणा लावु असा इशारा खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.

सत्याची भूमिका मांडणाऱ्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. जे जाहीरपणाने बोलतात त्यांच्याविरोधात यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. नवाब मलिक हे केंद्राच्या विरोधात सप्ष्टपणे भूमिका मांडतात, त्यामुळेचं अशा प्रकारे यंत्रणांचा वापर करुन कारवाई होत असल्याचे पवार यावेळी म्हणाले. मुस्लिम कार्यकर्ता असला, तर दाऊदचा माणूस असं म्हटलं जातं असेही पवार यांनी सांगितले. सत्तेचा गैरवापर करुन लोकांना त्रास देणे, बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचे पवार म्हणाले. दरम्यान, मी मुख्यमंत्री असताना देखील माझ्यावरही असेच आरोप केले जात होते असेही पवार यावेळी म्हणाले.

त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विटरच्या माध्यमातुन ईडीच्या कारवाईवर टीका केली आहे.ईडी ला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर या, शिवाजी पार्कात या ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने आम्ही १७० जणं एकत्र भेटू. आणि एक सांगते, कदाचित तुमचं काम संपेपर्यंत १७० चा आकडा आणखी वाढलेला असू शकतो. महाविकास आघाडीची एकजूट तुटणार नाही, उलट मजबूत होतेय. अशी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

हा महाराष्ट्राचा अपमान आहे.नवाब मलिकांना नोटीस न देता ईडी चौकशीसाठी नेत आहे. हा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग आहे. अशी प्रतिक्रीया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News