महाराष्ट्रातील महामार्गांच्या कामात शिवसेनेचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी अडथळे आणत आहे आणि हा त्रास बंद झाला नाही तर महामार्गाचे काम बंद कऱण्याचा विचार करावा लागेल, या शब्दात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी इशाला दिला आहे. गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही नाराजी व्यक्त केली होती. या पत्राची तातडीनं दखल घेऊन काय प्रकार आहे त्याची माहिती मागवली असल्याची प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालककमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे. ते वाशिंममध्ये पत्रकारांशी बोलत होते.
वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामात स्थानिक शिवसेना कार्यकर्ते अडथळा निर्माण करीत असल्याचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये जे काही स्पष्ट होईल त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नितीन गडकरींनी पत्रात काय म्हटले आहे?
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू आहेत. त्यातील काही महामार्गाचे प्रकल्प पूर्णत्वास आले तर काही ठिकाणी आहेत. सदर प्रकल्पामध्ये काम सुरु असताना काही ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनधी हे अडथळे आणीत आहेत. विविध नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना भंडावून सोडणे व त्यांनी न ऐकल्यास त्यांचे काम बंद पाडीत आहेतय. तरी आपणांस कळविण्यात येते की. उपरोक्त प्रकरणी आपण सदर कंत्राटदार यांच्याकडून लोकप्रतिनिधीविरुद्ध केलेल्या तक्रार अर्ज प्राप्त झाले आहे., त्या अनुषंगाने कोणावर गुन्हे दाखल झाले आहेत काय, तसेच या कार्यवाहीचा अहवाल शासनास तात्काळ उपलब्ध करून द्यावर ही विनंती.
उपरोक्त बाबी लक्षात घेता वाशिम जिल्हयातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरु ठेवावीत किंवा कसे? याबद्दल मंत्रालय आता गांभीर्याने विचार करीत आहे. ही कामे आहे त्या स्थितीत अंतिम सोडली तर वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील, अपघाताचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे जनतेच्या असंतोषाला समोर जावे लागेल. हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महमार्गांच्या कामाबाबत आम्हाला विचार करावा लागेल, व यामुळे जनतेचे नुकसान होईल. ही कामे पूर्ण करायची असतील तर यात आपला हस्तक्षेप आवश्यक आहे असे वाटते, असे गडकरी यांनी म्हटले आहे.