#ED संजय राऊतासाठी केली ८ दिवसाच्या काठडीची मागणी: कोर्टानं दिली ३ दिवसाची कोठडी
शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुमारे १५ तास चौकशी केल्यानंतर मध्यरात्री त्यांना अटक केल्यानंतर आज मुंबईच्या PMLA कोर्टानं ४ ऑगस्ट पर्यंत तीन दिवसाटी ED कोठडी दिली आहे. राऊत तपासात सहकार्य करत नाही..त्यासाठी आठ दिवसाच्या कोठडीची केलेली मागणी कोर्टानं फेटाळून लावली.
मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटक केल्यानंतर संजय राऊत यांना आज ईडी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी झालेल्या सुनावणीत ईडीने संजय राऊत यांना आठ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. ते तपासला सहकार्य करत नाहीत असं ईडीचं म्हणनं होतं. त्यावर त्यांनी लेखी वकिलामार्फत पत्र पाठवल्याचे राऊत यांच्या वकिलांनी सांगितल्यानं ते चौकशीत सहकार्य करत नाहीत असं म्हणता येणार नाही असंही कोर्टानं स्पष्ट केलं.
संजय राऊतांची रात्रीच्या वेळी चौकशी केली जाऊ नये अशीही विनंतीही करण्यात आली. यावर ईडीने सकाळी ८.३० ते ९.३० दरम्यान संजय राऊत वकिलांशी सल्लासमलत करु शकतात असं सांगितलं. तसंच रात्री १०.३० नंतर त्यांची चौकशी न करण्याची हमी दिली. घरची औषधं आणि जेवण देखील देता येईल असं EDने सांगितलं. त्यानंतर कोर्टाने निकाल वाचन करताना संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. संजय राऊतांना आठ दिवसांची कोठडी देण्याची गरज नसून चौकशीसाठी इतकी पुरेशी असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं.
विशेष सरकारी वकीत हितेन यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला १ कोटी सहा लाखांचा फायदा झाल्याचं सांगितलं. ईडीने यावेळी प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे फ्रंट मॅन असून आमच्याकडे किहीममधील जमीन विक्रेत्यांचे काही मालमत्तांबाबत जबाब असल्याची माहिती दिली. पुराव्यांसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही यावेळी ईडीकडून कऱण्यात आला.
संजय राऊतांना मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी ईडीने अटक केली. आज सकाळी मेडिकल चेकअपसाठी जेजे रुग्णालयात आणण्यात आलं तर दुपारी २ वाजता त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी संजय राऊत यांच्यावतीने जोरदार युक्तीवाद केला. संजय राऊत यांच्या मालकीच्या काही कंपन्या आहेत. या व्यवसायातून त्यांनी वैध मार्गाने पैसे कमावले आहेत, त्यांचा घोटाळ्याशी काडीमात्र संबंध नाही, असं अॅड. मुंदरगी यांनी सांगितलं. त्यावर पत्रा चाळ घोटाळ्यात प्रवीण राऊत केवळ मोहरा होता. या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार संजय राऊत हेच असल्याचं ईडीच्या वकिलांनी सांगितलं. तसेच राऊतांच्या ८ दिवसांच्या कोठडीची मागणी केली.
राऊतांचे वकील अॅड मुंदरगी यांनी मात्र याला विरोध दर्शवताना संजय राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केलंय. ८ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय?, असा सवाल उपस्थित करत संजय राऊत हे हर्ट पेशंट आहेत त्यामुळे त्यांना कमी दिवसांची रिमांड द्यावी अशी मागणी केली. संजय राऊत यांची चौकशी सुरू असताना ईडी कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केलं आहे. तसेच राऊतांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मैदानात उतरले आहेत. राऊत यांना अटक केल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे.
उद्धव ठाकरे समर्थन करत संजय राऊतांबद्दल मला अभिमान आहे. तुमच्याकडे बळ आहे म्हणून तुम्ही इतरांना संपवत असाल तर दिवस कायम राहत नाहीत. वस फिरतील तेव्हा नड्डा काय करणार? संजय राऊत यांचा गुन्हा काय आहे? ते निर्भिड पत्रकार आहेत. ते मरेन पण शरण जाणार नाही असं ते म्हणाले.