दसरा मेळावा : उद्धव ठाकरे गटाला सशर्त परवानगी

Update: 2022-09-23 11:22 GMT
दसरा मेळावा :  उद्धव ठाकरे गटाला सशर्त परवानगी
  • whatsapp icon

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई महापालिकेने उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोघांना मनाई केली होती.. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. या लढाईत ठाकरे गटाला कोर्टाने दिलासा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. या याचिकेवर हायकोर्टात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद केला. यानंतर महापालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारण्याचा महापालिकेचा निर्णय रद्द केला. तसेच ठाकरे गटाला परवानगी दिली आहे.

शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर शिंदे गटाने देखील शिवसेनेचा दसरा मेळावा करण्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी मागितली होती. तर उद्धव ठाकरे यांनीही येथे आम्हीच दसरा मेळावा घेणार अशी भूमिका घेतल्याने संघर्ष निर्माण झाला होता. त्यानंतर महापालिकेने पोलिसांच्या अहवालाचा हवाला देत दोन्ही गटांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर हायकोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने महापालिकेला फटकारले. तसेच २ ते ६ ऑक्टोबर दरम्यान मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. याच सुनावणी दरम्यान शिंदे गटानेही आव्हान याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली आहे.

राज्यसरकारने आपल्या निर्णयात याआधीच वर्षातील ४५ दिवसांपैकी काही दिवस शिवाजी पार्कवर उत्सव घेण्याची परवानगी दिली आहे. तसेच त्या मैदानावर शिवसेनेला परवानगी देण्यात येत होती, असे सांगत कोर्टाने ठाकरे गटाला दिलासा दिला आहे.

Tags:    

Similar News