उत्तर प्रदेश मधील निवडणुकीमध्ये दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. भाजपच्या अनेक ओबीसी नेत्यांनी भाजपला राम राम ठोकल्याने भाजपचं गणित बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच शेतकरी आंदोलनाने बॅंक फुटवर गेलेल्या भाजपसमोर आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हमीभावासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. जर उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पार्टीचं सरकार आलं तर सर्व पिकांना एमएसपी निश्चित करून मी भाव दिला जाईल. अशी घोषणा केली आहे. तसेच ऊसाची रक्कम 15 दिवसांच्या आत दिली जाईल. अशी घोषणा अखिलेश यादव यांनी केली जाईल.
एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे आश्वासन दिलं आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या प्रत्येक पिकाला हमीभाव देण्याचं आश्वासन अखिलेश यादव यांनी दिलं असून शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बाब ठरणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये जर योगी सरकार आलं तर सर्व शेतकऱ्यांविरोधातील गुन्हे मागे घेतले जातील. तसंच लखीमपूर खेरी प्रकरणातील मृत कुटुबियांच्या शेतकऱ्यांना २५-२५ लाख देण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश मधील पश्चिम उत्तर प्रदेश हा शेतकऱ्यांचा पट्टा म्हणून ओळखला जातो. त्यातच पुर्वांचल मधील अल्पभूधारक शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होईल. अखिलेश यादव यांची हमीभावाची घोषणा गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांना या घोषणेचा किती फायदा होईल पाहणे महत्त्वाचे आहे.
काय आहे उत्तर प्रदेशची राजकीय स्थिती... ?
उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ १४ मे २०२२ रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत १४ मे पूर्वी विधानसभा आणि नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये झाल्या. भाजप ३१२ जागा जिंकून सत्तेवर आला. सपा ४७, बसप १९ आणि कॉंग्रेसला ७ जागा मिळाल्या.
भाजपचे योगी आदित्यनाथ यांनी १९ मार्च २०१७ रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सीएम योगी हे भाजपचे पहिले मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.