राजभवन हे सरकारला मदत करण्यासाठी असतं, सरकारचे पाय खेचण्यासाठी नाही- राऊत

राज्याच्या राज्यपालांनी सरकारची अडवणूक करु नये. राजभवन हे सरकारला मदत करण्यासाठी असतं, सरकारचे पाय खेचण्यासाठी नसतं अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे;

Update: 2021-08-04 07:23 GMT

राज्याच्या राज्यपालांनी सरकारची अडवणूक करु नये. राजभवन हे सरकारला मदत करण्यासाठी असतं, सरकारचे पाय खेचण्यासाठी नसतं अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सोबतच जर तुम्ही सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर तुमचाच पाय गुंत्यात अडकून पडाल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

"राज्यपालांनी लोकनियुक्त सरकारची राजकीय कारणासाठी अडवणूक करु नये. मग ते विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्त्या असो की, एमपीएमसी संदर्भातील नियुक्त्या असो.

हा एक प्रकारे राजकीय दबावाचाच भाग आहे. खतरतर राज्यपालांचे बोलवते धनी वेगळेच आहेत. त्यांनी अशा वादात पडू नये." असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. "राजभवन हे सरकारच्या मदतीसाठी असतं. सरकारचे पाय खेचण्यासाठी नाही. पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर तुमचाच पाय गुंत्यात अडकून पडाल," असा इशारा राऊतांनी राज्यपालांना दिला आहे.

खरतर राज्यपालांना सरकारच्या कामाचा आढावा घेण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी त्यांनी गाव स्तरावर दौरे करण्याची गरज नाही. असं म्हणत भाजपाशासित इतर राज्यांमध्ये राज्यपाल दौरे काढताना दिसत नाहीत. मात्र, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील राज्यपाल असं होतांना दिसत आहे. हे ते स्वत: करतात की त्यांच्याकडून कोणी करून घेत याचाही विचार व्हायला हवा असं राऊत यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News