'त्या'वेळी काँग्रेसने हिंमत व नैतिकता दाखविली होती म्हणत खासदार संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

एकेकाळी काँग्रेस नेत्याकडून एक चूक झाली तर काँग्रेसने संबंधित नेत्याला पक्षातून निलंबित करण्याची हिंमत व नैतिकता दाखविली होती असं म्हणत खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.;

Update: 2021-08-29 04:24 GMT

मुंबई:   केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेमध्ये मागील काही दिवसांपासून प्रचंड वादंग सुरू असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. आजही सामनाच्या रोखठोकमधून खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांवर टीकेची झोड उठवली. त्याचसोबत त्यांनी भाजपवर देखील घणाघात केल्याचे पाहायला मिळत आहे.

एकेकाळी काँग्रेस नेत्याकडून एक चूक झाली तर काँग्रेसने संबंधित नेत्याला पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे म्हणत खासदार संजय राऊतांनी काँग्रेसचं मोठेपण केल्याचे पाहायला मिळत आहे.

एका गुजरात निवडणुकीच्या वेळी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांचा 'नीच' असा उल्लेख केला होता त्यावरून पक्षाने तात्काळ कारवाई केली होती.काँग्रेसने त्यावेळी हिंमत व नैतिकता दाखविली. नारायण राणे यांनीही तोच गुन्हा केला, मात्र, भाजप त्यांना पाठीशी घालत आहे, अशी खंत सामनाच्या रोखठोकमधून व्यक्त करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्ष हा संस्कार, संस्कृती, नैतिकतेवर भर देणारा पक्ष आहे. पण संस्कार व संस्कृती इतरांनी पाळायची, स्वतःवर आले की हात वर करायचे, असा टोला भाजपला लगावण्यात आला आहे.

"नारायण राणे यांना राजकीय मर्यादा आहेत. त्यांचे सगळय़ात मोठे भांडवल म्हणजे ते बोलताना, वागताना मर्यादांचे भान ठेवीत नाहीत. हे भांडवल तोकडे पडत असल्यामुळेच भाजपमध्ये मर्यादा सोडून वागणारे बाहेरचे लोक वापर करण्यासाठी लागतात.:

"या बेताल बडबडीमुळे महाराष्ट्राची राजकीय समीकरणे बदलण्याची सुतराम शक्यता नाही. उलट या सगळ्याचे परिणाम भाजपास भोगावे लागतील" असंही सामनातून राऊत म्हणालेत.

Tags:    

Similar News