खासदार प्रतापराव जाधव यांची शिवसेनेतून हकालपट्टी...

Update: 2022-07-24 11:05 GMT

एका बाजुला शिवसेना युवानेते आदित्य ठाकरेंचे झंझावती दौरे सुरु असताना शिवसेनेती बंडखोरांवर टप्प्याने कारवाई सुरु आहे.बुलडाणा खासदार प्रतापराव जाधव यांची हकालपट्टी झाली असून शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून हाकालपट्टी केली आहे. ..

शिवसेनेतील बारा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला ज्यामध्ये बुलडाणा खासदार प्रतापराव जाधव यांचाही समावेश होता...त्यांच्याकडे बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदाची देखील जबाबदारी होती... मात्र आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून खासदार प्रतापराव जाधव यांची हकालपट्टी करण्यात आल्याच पत्रक शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथून प्रसिद्ध करण्यात आले आहे...




 


तर मलकापूर व जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघासाठी नेमलेले शांताराम दाणे पाटील यांनाही जिल्हाप्रमुख पदावरून हटविण्यात येऊन, त्यांच्या जागी वसंतराव भोजने यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे...

यासह राजू मिरगे व संजय अवताडे यांनाही उपजिल्हाप्रमुख पदावरून काढून टाकण्यात आले आहे, तर नांदुऱ्याचे तालुकाप्रमुख संतोष डिवरे, मलकापूरचे तालुकाप्रमुख विजय साठे, व शेगावचे तालुकाप्रमुख रामा थारकर यांनाही तालुकाप्रमुख पदावरून हटविण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून 'सामना' द्वारे प्रकाशित पत्रकातून कळविण्यात आले आहे... तर लवकरच दुसऱ्या फळीतील नेत्यांची शिवसेनेच्या इतर पदावर नियुक्त्या केल्या जाणार आहेत... त्यामुळे अनेकांच्या आशा देखील पल्लवित होतांना दिसत आहेत...

Tags:    

Similar News