Bhosari Money Laundering Case: एकनाथ खडसे यांना आठवडाभर अटक करू नका: न्यायालय
Money Laundering Case High Court grants interim relief to NCP leader Eknath Khadse
भोसरी MIDC भूखंड प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना अटकेची टांगती तलवार होती. पीएमएलए कोर्टाने आठवडाभर अटक करू नये तसेच आपली बाजू मांडण्यासाठी आठवडाभराची मुभा द्यावी. न्यायालयाच्या या निकालामुळे खडसेंना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
एकनाथ खडसेंच्या भोसरी भूखंड प्रकरणी आज मुंबई सुनावणी झाली. प्रकृती ठीक नाही. मूळव्याधीचा त्रास आहे. कोर्टात तूर्तास हजेरी लावू शकत नाही. असं खडसे यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात सांगितल्यावर न्यायमूर्तीनी आठवडाभराचा अवधी खडसे यांना मिळाला आहे.
गेल्या आठवड्यात भोसरी भूखंड प्रकरणी एकानाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक न करण्याचा तात्पुरता दिलासा उच्चन्यायालयाने दिला आहे.
17 ते 7 डिसेंबरपर्यंत तपास यंत्रणेला आठवढ्यातून दोन वेळा ईडी कार्यालयात हजेरी लावण्याचे मंदाकिनी खडसे यांना निर्देश दिले आहेत.