मोदी म्हणजे भ्रष्टाचार, भाजप नेत्याचं ट्वीट व्हायरल, काँग्रेसने केली कारवाईची मागणी

मोदी म्हणजे भ्रष्टाचार असं भाजप नेत्याचं ट्वीट व्हायरल होत आहे. त्यावरून काँग्रेसने भाजप नेत्यावर कारवाईची मागणी केली आहे.;

Update: 2023-03-26 04:30 GMT

इथे मोदी, तिथे मोदी, जिकडे पहावं तिकडे मोदी, पण हे नेमकं काय आहे? कारण प्रत्येक मोदी नावाच्या व्यक्तीच्या पुढे भ्रष्टाचार असा शब्द लिहीला जातो, अशी टीका भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनी केली होती. ते ट्वीट सध्या व्हायरल होत आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सब मोदी चौर है म्हणाले होते. त्या वक्तव्यामुळे राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी गेली. त्यामुळे काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यातच भाजप नेत्या खुशबू सुंदर यांचे 2018 चे ट्वीट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मोदी म्हणजे भ्रष्टाचार, असं ट्वीट खुशबू सुंदर (Khushbu Sundar) यांनी केलं होतं. ते ट्वीट सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

खुशबू सुंदर यांचं ट्वीट

खुशबू सुंदर यांनी 2018 मध्ये काँग्रेस (Congress) पक्षात असताना पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामध्ये खुशबू सुंदर यांनी म्हटलं होतं की, इथे मोदी, तिथे मोदी, जिकडे पहावं तिकडे मोदी. पण मोदी नेमकं काय आहे? प्रत्येक मोदी नावाच्या व्यक्तीच्या पुढे भ्रष्टाचार हा शब्द आहे. तर याला समजून घ्या. मोदी म्हणजे भ्रष्टाचार. नीरव मोदी, ललित मोदी, नमो बरोबर भ्रष्टाचार असं ट्वीट केलं होतं. ते ट्वीट सध्या व्हायरल होत आहे.

राहुल गांधी यांनी सब मोदी चोर है असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली. तसेच त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली. मात्र आता खुशबू सुंदर यांचे हे ट्वीट पाहून काँग्रेसने खुशबू सुंदर यांच्यावरही कारवाई करणार का? असा सवाल केला आहे.

यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदी तुम्ही तुमच्या एखाद्या मोदी नावाच्या शिष्याकडून खुशबू सुंदर यांच्याविरोधात मानहानीची केस दाखल करणार का? कारण सध्या खुशबू सुंदर या भाजपच्या सदस्य आहेत. पाहूयात, धन्यवाद असं दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News