"हिंमत असेल तर समोरुन राजकीय वार करा", सुप्रिया सुळे यांचे लोकसभेत मोदी सरकारला आव्हान

Update: 2021-12-11 13:51 GMT

ED, CBI च्या गैरवापरावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर लोकसभे जोरदार हल्ला केला आहे. अनिल देशमुखांच्या घरावर एका वर्षात ७ छापे कशासाठी टाकले गेले, विरोधकांच्या पत्नी, मुलींना का छळले जात आहे, आपल्या नेत्यांची प्रकरणं दाबण्यासाठी भाजपकडे जादूची पावडर आहे का, असे सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. कितीही प्रयत्न केले तरी ५ नाही २५ वर्षे महाविकास आघाडी सत्तेत राहील असाही निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.


Full View

Tags:    

Similar News