राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत घेतलेल्या भुमिकेमुळे राज्याचे राजकारण तापले आहे. त्यातच राज ठाकरे यांनी ट्वीट करून कार्यकर्त्यांना पाठवलेले पत्र तळागाळापर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरे यांनी प्रार्थनास्थळांवरील भोंगे उतरवण्याबाबत भुमिका जाहीर केली होती. त्यातच 4 मे रोजी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड करण्यात आली. मात्र त्यानंतर राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत बोलताना भोंग्याबाबतचे आंदोलन थांबणार नसल्याचे म्हटले होते. तर राज ठाकरे यांनी पत्रातून आपली भुमिका तळागाळात पोहचवणार असल्याचे म्हटले होते.
राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत बोलताना अयोध्या दौरा स्थगित करत असल्याची घोषणा केली होती. तर त्यापाठोपाठ राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भोंग्याबाबतच्या आंदोलनासंबंधी पत्र पाठविण्यात येईल, असे सांगितले होते. त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पत्र पाठविले आहे. त्याबाबत राज ठाकरे यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
राज ठाकरे यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण देशातील राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यामुळे हा विचार प्रत्येकापर्यंत पोहचायला हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतून मनसे पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवण्यात आले आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा, असा आदेश राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
पुढे राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, तुम्ही फक्त एकच करायचं. माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात नेऊन द्यायचं आहे. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होऊ शकणार नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र सैनिकांसाठी... pic.twitter.com/vCoubS5Aix
— Raj Thackeray (@RajThackeray) June 2, 2022