हिंदू महासभाच्या उमेदवाराची राज ठाकरे यांच्याकडे पाठिंब्याची मागणी...
मला पाठिंबा द्या, तुमचा एक आमदार वाढेल, अशी ऑफर कसब्यातील एका उमेदवाराने थेट राज ठाकरे यांना दिली आहे. पुण्याच्या कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीची रंगत आता वाढली आहे. काँग्रेस आणि भाजपामध्ये इथे थेट लढत होणार आहे. मात्र राज ठाकरे यांनी ही ऑफर कुणी दिली आहे, ते नक्की वाचा...;
पुण्याच्या कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. काँग्रेस आणि भाजपामध्ये इथे थेट लढत होणार आहे. आता निवडणुकीमध्ये हिंदू महासभेचे नेते आनंद दवे यांनीही उमेदवारी अर्ज भरल्यामुळे इथे अधिक रंगत येणार आहे. या मतदार संघात दवे यांच्या उमेदवारीमुळे आता हिंदू मतांमध्ये फूट पडणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. याचा थेट फटका भाजपाला बसण्याची शक्यता आहे.
आनंद दवे यांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठिंब्याची मागणी केली आहे. "आपल्या पक्षाचा मला पाठिंबा मला द्या, तुमचा एक आमदार वाढेल" असे सूचक विधान आनंद दवे यांनी करत थेट राज ठाकरे यांनी ऑफर दिली आहे. आता दवे यांच्या सूचक विधानावर राज ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी पुढच्या आदेशापर्यंत कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करु नये, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र हिंदू महासभेचे नेते आनंद दवे यांनी राज ठाकरे यांनी ऑफर देऊन पोट निवडणुकीत रंगत आणली आहे. मनसेने जर मला पाठिंबा दिला तर मनसेचा एक आमदार वाढेल अशी प्रतिक्रिया दवे यांना दिली आहे. राज ठाकरे आणि हिंदू महासभेच्या भूमिका सारख्याच आहेत. त्यामुळे मनसेने मला पाठिंबा द्यावा, असे मत दवे यांनी व्यक्त केले आहे. कसबा निवडणुकीत मला पाठिंबा दिला तर माझा विजय सुकर होईल, असेही दवे पुढे म्हणाले.