संजय राऊतांना मनसेचे संदीप देशपांडे यांचे खरमरीत पत्र...

Update: 2023-02-22 08:37 GMT

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका निभावणारे ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मोठी भूमिका बजावली. मात्र त्यानंत आता शिवसेनेत जी आठ महिन्यांपूर्वी जी बंडाळी पाहायला मिळाली त्याला सुद्धा संजय राऊत हेच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहेत. नेमके हे कसे घडले की घडवण्यात आले यांचा मागोवा घेणार लेख...

राज्याच्या राजकारणात दररोज अनेक खुलासे आणि दावे-प्रतिदावे होत आहेत. मात्र या मागचा खरा सुत्रधार कोण आहे. हे आता जवळपास सर्वांना माहित झाले आहे. राज्यात मोठे सत्तांतर घडले, ठाकरे विरुद्ध शिंदे असा वाद विकोपाला गेला. या सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत हे नेहमी केंद्रस्थानी राहिले. दररोज सकाळी दहा वाजता मिडीयासमोर प्रगट होणारे संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांना यावेळी हवा देण्याचे काम केले. आणि त्यातून ननिन वाद निर्माण झाले. हे वादच आघाडी सरकारला सत्तेवरुन पायउतार होण्यास कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. आणि आजही राऊत वादग्रस्त वक्तव्य करुन ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. संजय राऊत यांच्यावर शिंदे गटाकडून नेहमी पलटवार केला जातो. मात्र मनसेनेही यामध्ये उडी घेतली आहे. आणि संजय राऊत यांच्यावर पत्राद्वारे खरमरीत टिका केली आहे. मनसेच्या संदीप देशपांडे यांनी चक्क पत्र लिहून राऊत यांनी सल्ला दिलाय.

'पटलं तर घ्या' या शिर्षकाखाली...मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना पत्र लिहून बोचरी टिका केली आहे. शिवसेना पक्षाचे नाव गेले आणि चिन्हही गेले. त्याला फक्त राऊत तुम्ही एकटेच जबाबदार आहात असे नाही. तर त्याला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाला तुम्ही दोन हजार कोटींची डील झाल्याचा आरोप केला. आणि हा न्याय आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका गुन्हेगाराला तुम्हाला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला. यासंदर्भातील तक्रार तुम्ही पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे केली. त्यावर सध्या चौकशी सुरु आहे. मात्र यावर भाष्य करताना संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना एक पत्र लिहून सल्ला दिला आहे. राऊत साहेब स्वत:ला वेळीच सावरा, नाहीतर एक दिवस असा येईल की, तुम्हाला रस्त्यावर पवार...पवार...असे ओरडत फिरावे लागेल आणि मोकळ्या रस्त्यावर दगड भिरकावे लागतील.

आता संदीप देशपांडे यांच्या पत्रावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे, गुंड, जन्मठेप ज्यांच्यावर आरोप आहेत. त्यांच्यावर मी प्रतिक्रीया देणार नसल्याचे राऊत यांनी सांगितले. तसेच शिंदे गट मिंधे गट वेगळे झाले आहेत. निवडणूक आयोगाने शिंदे गटावर मेहेरबानी केल्याचा आरोप राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. जी मूळ शिवसेना आहे ती आमच्यासोबत आहे. मी त्यांचा कडवा विरोधक असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले. कोण देशपांडे आहे का कोणी आणि मनसे असा पक्ष अस्तित्वात तरी आहे का? अशी टिका मनसे वर करत देशपांडे यांच्या पत्राचा खरपूस समाचार संजय राऊत यांनी घेतला. हमला करो, गोली मारो, फिर भी हम शिवसेना में ही रहेंगे...असे राऊत यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. तसेच त्यांना आमच्या कुटुंबातली काय माहिती आहे? असा सवाल विरोधकांना केला. तसेच पुण्यातील कसबा आणि चिंचवडची पोट निवडणूक आम्हीच जिंकणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.


Tags:    

Similar News