सरकारं बदलतात, काँट्रॅक्टर्स बदलतात म्हणत मनसेची टीका, पण रोख कुणाकडे?

मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत मनसेने थेट शिवसेना ठाकरे गटाविरुध्द मोर्चा उघडला आहे. त्यापाठोपाठ संदीप देशपांडे यांनी ट्वीट केल्याने चर्चांना उधाण आले आहे.;

Update: 2023-02-08 02:10 GMT

मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत मनसेने थेट शिवसेना ठाकरे गटाविरुध्द मोर्चा उघडला आहे. त्यापाठोपाठ संदीप देशपांडे यांनी ट्वीट केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई महापालिका (BMC Election) निवडणूक जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्यातच भाजप आणि शिंदे गटाने मुंबई महापालिकेत घोटाळा झाल्याचे आरोप करीत माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यापाठोपाठ आता संदीप देशपांडे यांनी आणखी एक ट्वीट केले आहे. (Sandeep Deshpande Tweet)

संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, सरकारं बदलतात, काँट्रॅक्टर्स बदलतात पण भ्रष्टाचाराची पद्धती (Corruption systyem) मात्र बदलत नाही म्हणजे ही व्यवस्थाच सडलेली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये संदीप देशपांडे यांनी पुढे म्हटले आहे की, मुंबई महापालिकेने रस्त्यांसाठी किती खर्च येईल? याचा अंदाज काढण्याचे काम टाटा कंपनीला (TATA) दिले होते. टाटा कंपनीने सर्व अभ्यास करून 5 हजार कोटी रुपयांच्या खर्चाचे अंदाजपत्रक महापालिकेला दिले. मात्र महापालिकेने हे अंदाजपत्रक नाकारून 7 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च वाढवून ही कामं आपल्या लाडक्या काँट्रॅक्टर्सना दिली, असा सर्रास भ्रष्टाचार मुंबई महापालिकेत सुरु आहे. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यातील जवळीक वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी हे ट्वीट केले आहे. याआधी मनसेने आपला मोर्चा ठाकरे गटाकडे वळवला होता. त्यामध्ये किशोरी पेडणेकर यांच्यावर संदीप देशपांडे यांनी सदनिका लाटल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता थेट हे ट्वीट केल्याने हा निशाणा कुणावर असा सवाल उपस्थित होत आहे.

गेल्या काही दिवसांपुर्वी पंतप्रधान मोदी यांनी मुंबईतील ४०० किलोमीटर रस्त्यांचे भूमीपुजन केले. हे रस्ते ६ हजार कोटी रुपयांचे असल्याचे जाहीर केले. मात्र त्यानंतर संदीप देशपांडे यांनी हे ट्वीट केले आहे. त्यामुळे संदीप देशपांडे यांचा निशाणा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 


Tags:    

Similar News