आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अमित ठाकरे सक्रिय

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दंड थोपटल्याचे पाहायला मिळत आहेत. सोबतच मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे देखील पक्षात सक्रिय काम करतांना दिसत आहे. अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. ते आज पक्षाच्या नेत्यांची,पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे.;

Update: 2021-07-28 04:28 GMT

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दंड थोपटल्याचे पाहायला मिळत आहेत. मनसेकडून मनसैनिकांच्या बैठकाचा धडाका सुरू करण्यात आला आहे. कालच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. तर मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे चिंरजीव अमित ठाकरे हे आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. तर मनसे प्रमुख राज ठाकरे देखील आज पुण्याचा दौरा करणार आहेत.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मनसेनं मागील काही दिवसांपासून अमित ठाकरे हे देखील पक्षात चांगलेच सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत. ते पक्षांतील पदाधिकारी-कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भेटी घेत आहेत. दरम्यान अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर असल्याने अमित ठाकरे यांच्याकडे नाशिक महापालिकेची जबाबदारी देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, मनसेकडून याबाबत अजून तरी अधिकृत घोषणा केलेली नाही. अमित ठाकरे यांनी नाशिककडे विशेष लक्ष देण्यास सुरूवात केल्याच पाहायला मिळतंय.

तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा दौऱ्यावर आहेत. मागच्या आठवड्यात देखील राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. एकुणच महापालिका निवडणुकीसाठी मनसेनं कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे.

Tags:    

Similar News