BJP Vs MNS राज ठाकरे- आशिष शेलारांची जुंपली...

ED ची नोटीस आल्यानंतर झेंड्यासह दिशा बदलणारे मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thakre) कॉंग्रेसच्या कर्नाटक (Karnataka) विजयावरुन पहिल्यांदच भाजपवर (BJP) प्रहार केला आहे. राज ठाकरेंच्या भाजपवरील टीकेला भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलांरांची (Ashish Shelar) खोचक उत्तर दिले होते. शेलार- ठाकरे वादामुळे आता भाजप- मनसे (MNS)चांगलीच जुंपली आहे.;

Update: 2023-05-15 03:39 GMT

ED ची नोटीस आल्यानंतर झेंड्यासह दिशा बदलणारे मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thakre) कॉंग्रेसच्या कर्नाटक (Karnataka) विजयावरुन पहिल्यांदच भाजपवर (BJP) प्रहार केला आहे. राज ठाकरेंच्या भाजपवरील टीकेला भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलांरांची (Ashish Shelar) खोचक उत्तर दिले होते. शेलार- ठाकरे वादामुळे आता भाजप- मनसे (MNS)चांगलीच जुंपली आहे.

मोठ्या उत्कंठेची ठरलेल्या कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १३५ जागांसह बहुमत मिळालं. भाजपाचा ६६ जागांसह दारूण पराभव झाला आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला सुनावलं होतं. कर्नाटकातील विजय हा काँग्रेसचे यश असून, आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही, असं समजणाऱ्या प्रवृत्तीचा पराभव आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.

मागील काही दिवसात राज ठाकरेंची ED चौकशी झाल्यानंतर पक्षामधे झेंड्यासह अनेक फेरबदल करण्यात आले होते. मशिदीचे भोंगे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे- भाजप एकत्र येणार अशी चर्चाही आहे. परंतू राज ठाकरेंच्या भाजप टीकेवर मुंब भाजपा अध्यक्ष आशीष शेलार

चांगलेच संतापले आहे.

“घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो. जर कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव असेल, तर मग जालंधरमध्ये आम आदमी पक्षाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव का झाला? उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही भाजपाला घवघवीत यश मिळालं. मग तिथे ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव नव्हता का? यावर राज ठाकरे बोलतील का?”, असा सवाल आशीष शेलार यांनी विचारला. याला राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“ज्यांची पोहच नसते, त्यांना या गोष्टी सुचू शकतात. ही कोण लोक आहेत मुळात… निवडणुका असल्यावर नाक्यावर सभा घेणारी ही

लोक आहेत. विरोधकांच्या गोष्टी मान्य करायला हव्यात. ही गोष्ट फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात. त्यामुळे त्यांच्या पक्षातील लोकांनाही या गोष्टी कळल्या पाहिजेत,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी शेलारांचा समाचार घेतला होता.

“‘भारत जोडो’ यात्रेला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचा परिणाम कर्नाटकात झाला. म्हणून काही गोष्टी मोठ्या मनाने मान्य करायला पाहिजेत. एखाद्या पराभवातून काहीजणांना बोध घ्यायचा नसेल, तर तसेच वागा,” असे राज ठाकरेंनी म्हटलं.‘राज ठाकरे हे केवळ स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी वक्तव्य करतात’, असंही आशीष शेलार म्हणाले. याबद्दल विचारल्यावर राज ठाकरेंनी सांगितलं, “यांचं अस्तित्व मोदींवर आहे. यांना कोण ओळखतं? ही छोटी माणसं आहेत”, असं उत्तर दिलं आहे. मनसे- भाजप वाद वाढल्यानं आता कर्नाटक निवडणुक निकालाचे राज्यातील राजकीय समीकरणं देखील बदलण्याच्या मार्गावर असल्याचं दिसत आहे.

Tags:    

Similar News