महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पाऊसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकणात तर महापुराचा धोका ठिकठिकाणी वाढत चालला आहे. आधीच रत्नागिरी आणि रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिस्थिती गंभीर आहे. रायगड जिल्ह्यात दरडग्रस्त मृतांचा आकडा 60 वर पोहचला,महाड तालुक्यातील तलई 49 आणि तलई गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील 49 मृतदेह आतापर्यंत आढळले आहेत. तर अनेकजण अजून बेपत्ता आहेत.
पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व घडत असताना महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, या सर्व प्रलयावर बॉलिवूडच्या एकाही अभिनेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. यावर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सवाल केला आहे. ते म्हणतात... 'इतर राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर बॉलिवूडमधून मदतीसाठी अनेकजण पुढे येतात. माझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही कलाकाराला साधं ट्विटही करावंसं वाटत नाही, याचं आश्चर्य वाटतं. अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदतकार्य सुरू केलेलं आहे. आमचे महाराष्ट्र सैनिकही झटतायत. अशावेळी माझ्याच राज्यात राहून मोठं झालेल्या बड्या बॉलिवूड ताऱ्यांनी थोडं संवेदनशील व्हावं आणि मदतकार्याला हातभार लावावा असं जाहीर आवाहन करतो,' असं त्यांनी ट्विट केला आहे.