...तर भाजपाचा कार्यकर्ता सहन करणार नाही. आमदार मंगल लोढा संजय राऊतांना इशारा
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नकतेच राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडु यांना पत्र लिहुन ईडी आपला छळ करत असल्याचे म्हटले आहे.महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याचा आरोप संजय राऊतांनी यावेळी केला. दरम्यान दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांना जाहीर आव्हान दिलं होतं.सकाळी घेतलेल्या या पत्रकार परिषदेवरुन शिवसेना वि. भाजप यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे.त्यात आता भाजपाचे आमदार मंगल लोढा यांनी उडी घेतली आहे. आमदार लोढा यांनी ट्विटरच्या माध्यमातुन आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही जर नागपुरात घुसलो तर तुम्हाला नागपुरलाही जाता येणार नाही,आणि मी काय बोलतोय हे देवेंद्र फडणवीसांना नीट कळतंय,असं संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हटले होते.त्या वाक्याला अधोरेखित करुन देवेंद्र फडणवीस हे केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हे, तर या राज्याचे लोकप्रिय नेते आहेत.तसेच सर्वाधिक सदस्य असलेल्या पक्षाचे विधीमंडळाचे नेते आहेत.त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी भाजपाचा कार्यकर्ता सहन करणार नाही.असे ट्विट करुन लोढा यांनी इशारा दिला आहे.
मा. @Dev_Fadnavis जी हे केवळ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नव्हे, तर या राज्याचे सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत, तसेच सर्वाधिक सदस्य असलेल्या पक्षाचे विधिमंडळाचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी भाजपाचा कार्यकर्ता सहन करणार नाही. https://t.co/IiCsIoWfft
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) February 9, 2022
"महाराष्ट्रात सरकार आल्यापासून मी त्यांची वेदना समजू शकतो. त्यांनी राजकीय लढाई लढावी. हे क्रिमिनल सिंडिकेट चालवत आहेत. सध्या ईडी आणि इतर यंत्रणा भाजपा किंवा त्यांच्या मालकांच्या क्रिमिनल सिंडिकेटचा भाग बनले आहेत. आजचं पत्र हा ट्रेलरही नाही, ट्रेलर अजून यायचा आहे. आजचं पत्र फक्त माहितीसाठी लिहिलं आहे. ईडीचे लोक कशाप्रकारे सिंडिकेट चालवतात, यांचे स्व:तचे आर्थि घोटाळे कसे आहेत, मनी लॉण्ड्रिंग करतात, ब्लॅकमेल करतात, धमकावतात आणि यांचे वसुली एजंट बाहेर आहेत हे पुराव्यानिशी सिद्ध करणार," असा इशारा संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला होता.