आमदार बच्चू कडूना दोन वर्षाची शिक्षा...
आमदार बच्चू कडू हे आपल्या आक्रमक स्वभावासाठी आणि रोखठोकपणासाठी प्रसिद्ध आहेत. सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. आणि काही वेळतच त्यांना जामीन सुद्धा मंजूर करण्यात आला.
नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने (Nashik Sessions Court) आमदार बच्चू कडू (BACCHU KADU) यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण प्रकरणी आणि एका सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान शिक्षा सुनावल्यानंतर उच्च न्यायालयात अपील करेपर्यंत नाशिक सत्र न्यायालयानेच बच्चू कडू यांना तात्पुरता जामीन देखील मंजूर केला.
२०१७ साली दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी नाशिक महानगरपालिकेत (Nashik Municipal Corporation) आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान बच्चू कडू आणि तत्कालीन नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा ( Commissioner Abhishek Krishna ) यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी आयुक्त अभिषेक कृष्णा (Abhishek Krishna) यांच्यावर हात उगारला होता. या घटनेप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि याच गुन्ह्याप्रकरणी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने (Nashik Sessions Court) बच्चू कडू यांना आज शिक्षा सुनावली.
न्यायालयाच्या निकालावर बोलताना ३५३ कलमाचा गैरवापर सरकारी अधिकारी करत असल्याचे सांगत या कलम संदर्भात विधानसभेत लक्षवेधी मांडणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली. तसेच जामिनासाठी वरच्या न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया कडू यांनी व्यक्त केली. न्यायालयाने बच्चू कडू यांना सरकारी अधिकाऱ्यांना दमदाटी करणे आणि सरकारी कामांत अडथळा आणणे, दोन कलमांतर्गत दोषी ठरवलं आहे. मात्र बच्चू कडू (BACCHU KADU) यांना अशाप्रकारे शिक्षा सुनावल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. २०१७ पासून या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. अखेर आज नाशिक सत्र न्यायालयाने (Nashik Sessions Court) बच्चू कडू (BACCHU KADU) कडू यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली.