नगरपंचायत Election: नांदेडमधे अशोक चव्हाणांनी गड राखला

नांदेड जिल्ह्यातील तीन नगरपंचायत निकाल लागले असून दोन नगरपंचायत काँग्रेसच्या ताब्यात तर एक ठिकाणी राष्ट्रवादीला बहुमत मिळाले आहे. अशोक चव्हाणांनी गड राखला आहे.;

Update: 2022-01-19 08:59 GMT

ओबीसी आरक्षणामुळे दोन टप्प्यात झालेल्या नगर पंचायत निवडणुकीसाठी उर्वरित काही जागांसाठी मंगळवारी मतदान झाले , त्यानंतर दोन्हीही टप्याच्या मतदानाचा निकाल आज जाहीर करण्यात आला . नांदेड जिल्ह्यातील नायगाव, अर्धापूर व माहूर नगरपंचायतीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर नायगाव व अर्धापुर येथे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून यापूर्वीही या दोन्हीही नगरपंचाती काँग्रेसच्या ताब्यात होत्या ,त्या राखण्यात काँग्रेसला यश मिळालं आहे ,तर अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली माहूर नगरपंचायत निकालमध्ये यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत मिळविले आहे त्या पाठोपाठ जागा काँग्रेसने मिळविल्यामुळे माहूर नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व निश्चित झाले आहे .

या निवडणुकीत अर्धापुर नगरपंचायत निकालात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून काँग्रेस १० जागा, एमआयएम ३ , भाजपा २ , राष्ट्रवादी १ , तर अपक्ष १ अशा जागांवर विजयी झाले आहेत. तर नायगाव नगरपंचायत निकाल हा एकतर्फी काँग्रेसच्या पारड्यात जनतेनी टाकला असून इथल्या १७ जागांपैकी १७ जागांवर काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविला आहे ,यात ३ ठिकाणी बिनविरोध विजयी झाल्यामुळे नायगाव काँग्रेस पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात आली आहे .

माहूर नगर पंचायतीच्या निवडणुक निकालात काँग्रेसला ६ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस ०७ जागा, भाजपा १ , तर शिवसेनेला ३ जागांवर विजय मिळाला आहे . माहूरमध्ये राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत असले तरीही महाविकास आघाडी असल्यामुळे काँग्रेस किंवा शिवसेनेच्या दोन जागांनी हे वर्चस्व कायम ठेवण्यात राष्ट्रवादीला यश मिळालं आहे . या तिन्हीही नगर पंचायत निवडणुकीत भाजपा केवळ ३ जागा मिळाल्या असून भाजपाला तिन्हीही नगर पंचायतीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

नांदेड जिल्ह्यातील तीन नगर पंचायत निवडणुकीचे निकाल

नायगाव नगर पंचायत

१७ पैकी १७ जागांवर काँग्रेस विजयी.

मागील वेळी काँग्रेस १३ जागा जिंकली होती.

अर्धापूर नगर पंचायत

१७ पैकी १० जागा जिंकून काँग्रेसला स्पष्ट बहुमत

गेल्या वेळीही काँग्रेसला १० जागा मिळाल्या होत्या.

माहूर नगर पंचायत

१७ पैकी काँग्रेस ६ जागांवर विजयी... गेल्यावेळी काँग्रेसच्या ३ जागा आल्या होत्या...

या नगर पंचायतीत राष्ट्रवादीला ७ तर शिवसेनेला ३ जागा मिळाल्या आहेत...

नांदेड जिल्ह्यात भाजपचा धुव्वा उडाला आहे. माहूरला १ व अर्धापूरला २ मिळून त्यांना नांदेड जिल्ह्यात फक्त ३ जागा मिळाल्या आहेत.

जिल्ह्यातील ५१ पैकी ३३ जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे.

Tags:    

Similar News