रामदास आठवले यांची मुख्यमंत्र्यांना ऑफर, सत्ता वाटपाचाही दिला फॉर्म्युला
यवतमाळ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. आता या विषयावरील चर्चेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. मुख्यमंत्री जे बोलले, त्यामुळे कोण कुणासोबत जाईल हे सांगता येत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रिपाई व भाजपसोबत यावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली पाहिजे. अन्यथा शिवसैनिक सेनेपासून दूर जाईल. अडीच वर्ष सेना आणि अडीच वर्ष भाजप असा मुख्यमंत्री पदाचा फार्मूला ठरू शकतो. भाजपही सकारात्मक विचार नक्की करेल, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.