'ही व्यक्ती कोण? आणि समीर वानखेडे यांच्याशी त्यांचे नातं काय?'; मंत्री नवाब मलिक यांचा सवाल

Update: 2021-10-31 04:41 GMT

मुंबई : क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानची जामिनीवर सुटका करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा हल्लाबोल सुरूच आहे. मंत्री मलिक यांनी आता आणखी एक फोटो ट्वीट करत, ही व्यक्ती कोण आहे? असा सवाल करत समीर वानखेडे यांच्या कुटुंबावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

नवाब मलिक यांनी एकापाठोपाठ एक आरोप सुरू केल्याने NCB आणि समीर वानखेडे यांची चांगलीच कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. मलिक यांनी काल एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये एका व्यक्तीचा फोटो आहे. ही व्यक्ती कोण आहे? असा सवाल मलिक यांनी केला आहे. हा फोटो अब्दुल अझीझचा असल्याची माहिती समोर येत आहे. तर अब्दुल अझीझ यांचे नाव समीर वानखेडे यांच्या पहिल्या निकाह नाम्यात आहे.

दरम्यान NCB ने कारवाई दरम्यान बनवलेला पंच फ्लेचर पटेल कोण आहे? असा सवाल देखील मलिक यांनी उपस्थित केला आहे. तसेच फ्लेचर पटेल बरोबर फोटोत असणारी लेडी डॉन कोण आहे? असंही मलिक यांनी विचारले होते. दरम्यान मी NCB ला सांगणार आहे की, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासा करावा,असेही मलिक म्हणाले होते.

Tags:    

Similar News