राजकारणात भांडणाच्या वेळी भांडण करायचे पण त्यासाठी वैयक्तिक संबंध खराब करण्यात अर्थ नाही, असे मत व्यक्त केले आहे मंत्री गुलाबराव पाटील यांनी...जळगाव जिल्ह्यातील धरणगावमध्ये कापूस खरेदीचा आरंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना गुलाबराव पाटील यांना ठाकरे आणि शिंदे गटातील सहकारी एकत्र आल्याबाबत विचारले असता आम्ही काही एकमेकांना गोळ्या घातलेल्या नाही, असे उत्तर त्यांनी दिले.