मिलिंद नार्वेकर शिंदे गटाच्या संपर्कात?
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते मिलिंद नाव्रेकर हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. याबाबतचा दावा शिंदे गटाच्या आमदाराने केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. नार्वेकर लवकरच शिंदे गटात सहभागी होतील, असा दावा सुद्धा या आमदाराने केला आहे.;
राज्याच्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली. मात्र ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर ( Milind Narvekar) हे आमदार नसतानाही सभागृहात बसल्याचे आढळून आल्याने, राज्याच्या राजकारणात एकच खळबळ पाहायला मिळाली. यावरुन राजकीय चर्चा सुरु असताना नार्वेकर हे आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ) यांनी केला. विधीमंडळ परिसरात शिरसाट प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ही प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मिलिंद नार्वेकर ( MILIND NARVEKAR ) यांची गेल्या अनेक वर्षापासून आमदार व्हायची इच्छा आहे. मिलिंद नार्वेकर यांनी सभागृहात जाण्यासाठी कोणाची परवानगी घेतली, हे मला माहित नाही. असे शिरसाट यावेळी म्हणाले. मात्र नार्वेकर हे आमदार होण्याचा मार्ग शोधत आहेत. तसचे उद्धव ठाकरे ( UDDHAV THACKERAY ) हे सुद्धा नार्वेकर यांना जवळचे समजत नसल्याचे शिरसाट यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे मिलिंद नार्वेकर हे लवकरच सभागृहात येतील, असा दावा शिरसाट यांनी केला. मिलिंद नार्वेकर आणि इतर काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा संजय शिरसाट ( SANJAY SHIRSAT ) यांनी केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही शिरसाट यावेळी म्हणाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाअगोदरच्या चहा-पाण्याच्या खर्चावरुन सुद्धा शिंदे सरकारवर टिका केली. याटिकेला संजय शिरसाट ( SANJAY SHIRSAT ) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या खर्चाची आम्हाला जाणीव असल्याचे शिरसाट यांनी सांगत, राज्यभरातून भेटायला येणारा कार्यकर्ता, शेतकरी,( FARMER ) सामान्य नागरिक हा चहा-पाण्याशिवाय जाऊ नये, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, त्यामध्ये काहीही वावगं नाही, असे सुद्धा शिरसाट म्हणाले. मात्र आघाडी सरकारचे मुख्यमंत्री आमदारांना भेटतचं नव्हते, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला भेटण्याचा प्रश्न उरत नाही. म्हणू त्याचा खर्चही कमी होता, असा टोला संजय शिरसाट ( SANJAY SHIRSAT ) यांनी उद्धव ठाकरे ( UDDHAV THACKERAY ) यांनी यावेळी लगावला.