मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर यांनी खोलले पत्ते

मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत ज्यांच्या भुमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यातच माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर यांनी शेवटचा क्षणी आपले पत्ते खोलले आहेत. शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत त्यांनी कोणाला पाठिंबा दिला आहे वाचा या बातमीमध्ये…;

Update: 2023-01-29 16:08 GMT

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत जयदत्त क्षिरसागर यांनी आपला पाठींबा कुणालाही जाहीर केला नव्हता. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. पण त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दूरध्वनी संवाद झाल्यानंतर निवडणूक प्रभारी राणा जगजीत सिंह पाटील तातडीने बीडला पोहचले. नवगन कॉलेजमध्ये क्षिरसागर यांच्या आदेशानुसार संस्था चालकांची बैठक राणा यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडणूक लढवणारे किरण पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. या निर्णयामुळे विक्रम काळे यांना फार मोठा फटका बसणार आहे.

अनेक वर्षा पासून विक्रम काळे यांना त्यांची मदत होत होती. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शाळा कॉलेज आणि त्यांचे समर्थक असलेले संस्था चालक असून एक हजार मताच्या आसपास त्याची ताकद आहे. त्यांच्या या निर्णयामुळे विक्रम काळे यांना मोठा फटका बसणार असल्याचा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.

Tags:    

Similar News