मंदाकिनी खडसे यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, अटक झाल्यास मिळणार जामीन
भोसरी MIDC भूखंड प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आल्याने खडसे परिवाराला दिलासा मिळाला आहे.
भोसरी MIDC भूखंड प्रकरणी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसें यांना मुंबई सेशन कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले होते, यामुळे मंदाकिनी खडसे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती.
सेशन कोर्टाने अटकपूर्व जामीन नामंजूर झाल्याने मंदाकिनी खडसे यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. खडसे यांना तूर्तास अटक करू नये असे निर्देश दिले आहेत. 17 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर पर्यंत तपासात सहकार्य करण्याचे निर्देशही मंदाकिनी खडसे यांना उच्च न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान मंदाकिनी खडसे यांना अटक झाल्यास 50 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाल्यास त्यांना 17 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या कालावधीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी ईडीसमोर हजर रहावं लागणार आहे.
21 ऑक्टोबरला त्यांना विशेष न्यायालयातही हजर रहावं लागणार आहे. असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाची सुनावणी 29 ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयात पार पडणार आहे.