ममता बॅनर्जी सोनिया गांधी यांची भेट, राहुल गांधीही उपस्थित, काय झालं बैठकीत?

ममता बॅनर्जी सोनिया गांधी यांची भेट, राहुल गांधीही उपस्थित, काय झालं बैठकीत? Mamata Banerjee Meets Sonia Gandhi Need To Come Together To Defeat BJP

Update: 2021-07-28 12:19 GMT

दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्ली येथे सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राहुल गांधी देखील उपस्थित असल्याचं ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

विरोधी पक्षाची एकजूट, पेगासस हेरगिरी प्रकरण, कोरोना नंतरची स्थिती यावर विरोधी पक्षाची चर्चा झाल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली. ही भेट सकारात्मक होती. असं ममता यांनी म्हटलं आहे.

ममता यांनी त्यांच्या दिल्ली दौऱ्यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्यासह अभिषेक मनू सिंघवी आणि आनंद शर्मा यांची देखील भेट घेतली. आज त्या अरविंद केजरीवाल यांची देखील भेट घेणार आहेत. तसंच त्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची देखील भेट घेणार असल्याचं समजतंय.

ममता यांच्या या भेटीगाठीवर दिल्लीत चांगली चर्चा सुरु आहे. आज माध्यमांशी बोलताना ममता यांना प्रसारमाध्यमांनी त्या विरोधी पक्षाचा चेहरा असतील का? असा सवाल केला असता त्यांनी

"मी राजकीय भविष्यवाणी करणारी व्यक्ती नाही. हे सर्व ज्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. सिस्टीम आणि पद्धतीवर अवलंबून असेल. राजकीय पक्ष एकत्रितपणे कसं काम करतात, त्यावर अवलंबून आहे. त्यातून नेतृत्व पुढे येईल. कुणीही नेतृत्व केलं तरी मला अडचण नाही. आम्ही त्याला पाठिंबा देऊ"

असं मत ममता यांनी व्यक्त केलं आहे. मात्र, देशात मोदी विरोधात आघाडी तयार करण्याचं काम प्रशांत किशोर करत असल्याचं समजतंय. त्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा दिल्ली दौऱा महत्त्वाचा मानला जात आहे.



Tags:    

Similar News