नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये वन टू वन चर्चा

Update: 2022-04-30 08:29 GMT

देशाच्या कायदेमंत्रालयाची आज एक परिषद (३० एप्रिल)दिल्ली येथे पार पडली. या पत्रकार परिषदेला सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चर्चा केली. या चर्चेवेळी सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांच्यासह लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला देखील उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगाल मध्ये भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस मध्ये तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरली आहे. या भेटीदरम्यान मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये पश्चिम बंगालच्या कायदा सुव्यवस्थेसह काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याचं समजतंय.

Tags:    

Similar News